Sunday, August 24, 2014

असा काढा उत्पन्नाचा दाखला

|| मराठा आरक्षण हेल्पलाईन ||

असे काढा उत्पन्नाचे दाखले

©लेखन - अनिल माने.

येथे वाचा - http://esbc-maratha.blogspot.in

शैक्षणिक स्कॉलरशिपचा फायदा घेण्यासाठी एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आणि नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. हे दाखले काढण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करा.
=======================

पायरी १) उत्पन्नाबाबतचे पुरावे काढणे.

१) आपले रेशनकार्ड
२) उत्पन्न दाखला
अ) अर्जदार शेतकरी/मजूर असल्यास आपले रेशनकार्ड दाखवुन गाव कामगार तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा (शैक्षणिक कामासाठी असा उल्लेख करुन) मागील एक व तीन वर्षांचा असे दोन उत्पन्नाचा दाखला घ्या.
ब) अर्जदार नोकरदार असल्यास पगाराचे प्रमाणपत्र/आयकर घ्या.
क) अर्जदार व्यावसायिक असल्यास आयकर विवरण पत्र घ्या.
ड) अर्जदाराला वैद्यकीय कारणासाठी प्रमाणपत्र हवे असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घ्या.
ई) अर्जदार जर पेन्शनर असतील तर बँकेचे पासबुक/बँकेचे प्रमाणपत्र घ्या.
३) तसेच तलाठ्याकडुन तुमच्या नावाचे दोन रहीवासी दाखले घ्या.
३) अशा प्रकारे तुमच्याकडे
● रेशनकार्ड सत्यप्रत
● एक वर्ष व तीन वर्ष उत्पन्नाचे दाखले
● रहिवासी दाखले
प्रमाणे दाखले काढुन तयार ठेवा.
=======================

पायरी २) तहसीलदार कार्यालयातुन एक वर्ष उत्पन्नाचा दाखला काढणे.

१) तुमच्या तलाठीने दिलेला उत्पन्नाचा दाखला व रहिवासी दाखला घेऊन तहसीलदार कार्यालय मधे जा.

२) तेथुन उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारा अर्ज घ्या. अर्ज व्यवस्थित भरुन आवश्यक तेथे तुमची सही करा. अर्जावर ५रु. किंमतीची तिकीट/कोर्ट फी स्टँप लावा.

३) पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडा -
● पुर्ण भरलेला व तिकीटे लावलेला अर्ज
● रेशनकार्डची सत्यप्रत
● रहिवासी दाखला
● एक वर्ष उत्पन्नाचा दाखला
● साध्या कोऱ्या कागदावर एक वर्षाच्या उत्पन्नाबाबत तुमचे स्वतःचे सत्य प्रतिज्ञापत्र व त्यावर ५ रु. चे तिकीट/कोर्ट फी स्टँप
अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान पालकाने अर्जदाराच्या नावाने केलेले प्रतिज्ञापत्र.
एक वर्षाच्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना पाहण्यासाठी इथे क्लिक करा )

४) कार्यालयीन प्रक्रिया -
● हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला अर्ज घेऊन सेतुमधे जा.
● सेतुमध्ये अर्ज व त्यावरील माहिती अचुक भरली आहे का ते तपासुन घ्या. माहिती तपासल्यानंतर तुमच्या प्रतिज्ञापत्राची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर शिक्के देऊन सक्षम प्राधिकाऱ्याची सही आणण्यासाठी पाठवले जाईल.
● शिक्के मारलेल्या अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर सक्षम प्राधिकाऱ्याची सही घ्या.
● सही झाल्यानंतर तुमचा अर्ज सेतु मधे जमा करा.
● अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचा उत्पन्नाचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते. हे टोकन जपुन ठेवावे.
● टोकनवर दिलेल्या तारखेला येऊन टोकन दाखवुन आपला उत्पन्नाचा दाखला घ्यावा व सर्व माहिती अचुक आहे का ते तपासुन पहावे.

उत्पन्नाचा दाखला मिळाल्यावर त्याच्या आवश्यक तेवढ्या सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा
=======================

पायरी ३)  तहसीलदार कार्यालयातुन तीन वर्ष उत्पन्नाचा दाखला काढणे.

१) तुमच्या उत्पन्नाचे,रहिवासी पुरावे घेऊन तहसीलदार कार्यालय मधे जा.

२) तेथुन उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारा अर्ज घ्या. अर्ज व्यवस्थित भरुन आवश्यक तेथे तुमची सही करा. अर्जावर ५रु. किंमतीची तिकीट/कोर्ट फी स्टँप लावा.

३) पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडा -
● पुर्ण भरलेला व तिकीटे लावलेला अर्ज
● रेशनकार्डची सत्यप्रत
● रहिवासी दाखला
● तीन वर्ष उत्पन्नाचा दाखला
● साध्या कोऱ्या कागदावर तीन वर्षाच्या उत्पन्नाबाबत तुमचे स्वतःचे सत्य प्रतिज्ञापत्र व त्यावर ५ रु. चे तिकीट/कोर्ट फी स्टँप
अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान पालकाने अर्जदाराच्या नावाने केलेले प्रतिज्ञापत्र.

तीन वर्ष उत्पन्नाबाबत प्रतिज्ञापत्राचा नमुना पाहण्यासाठी इथे क्लिक करा

४) कार्यालयीन प्रक्रिया -
● हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला अर्ज घेऊन सेतुमधे जा.
● सेतुमध्ये अर्ज व त्यावरील माहिती अचुक भरली आहे का ते तपासुन घ्या. माहिती तपासल्यानंतर तुमच्या प्रतिज्ञापत्राची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर शिक्के देऊन सक्षम प्राधिकाऱ्याची सही आणण्यासाठी पाठवले जाईल.
● शिक्के मारलेल्या अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर सक्षम प्राधिकाऱ्याची सही घ्या.
● सही झाल्यानंतर तुमचा अर्ज सेतु मधे जमा करा.
● अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचा उत्पन्नाचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते. हे टोकन जपुन ठेवावे.
● टोकनवर दिलेल्या तारखेला येऊन टोकन दाखवुन आपला उत्पन्नाचा दाखला घ्यावा व सर्व माहिती अचुक आहे का ते तपासुन पहावे.
उत्पन्नाचा दाखला मिळाल्यावर त्याच्या आवश्यक तेवढ्या सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा
=======================
प्रत्येकाने ही माहीती शेअर करा.
जमले तर पाम्पलेट काढुन वाटा.
जातीचे दाखले काढण्यासाठी शिबिर भरवा.
=======================
सौजन्य - www.esbc-maratha.blogspot.in
=======================

No comments:

Post a Comment