Sunday, August 24, 2014

असे काढा नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र

|| मराठा आरक्षण हेल्पलाईन ||

असे काढा नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
©लेखन - अनिल माने.
येथे वाचा - http://esbc-maratha.blogspot.in

मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढावे लागेल.त्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करा.
=======================

पायरी १) जातीचा दाखला काढणे.
१) जातीचा दाखला कसा काढावा याच्या माहितीसाठी इथे क्लिक करा
२) दिलेल्या माहितीप्रमाणे जातीच्या दाखल्याची सत्यप्रत तयार ठेवा.
========================

पायरी २) तहसीलदार कार्यालयातुन तीन वर्ष उत्पन्नाचा दाखला काढणे.

१) तीन वर्ष उत्पन्नाचा दाखला कसा काढावा याच्या माहितीसाठी इथे क्लिक करा
२) दिलेल्या माहितीप्रमाणे तीन वर्षाच्या उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत तयार ठेवा.
=======================

पायरी ३) तहसीलदार कार्यालयातुन तीन वर्ष उत्पन्नाचा दाखला काढणे.

१) तुमच्या उत्पन्नाचे,रहिवासी पुरावे घेऊन तहसीलदार कार्यालय मधे जा.

२) तेथुन उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारा अर्ज घ्या.अर्ज व्यवस्थित भरुन आवश्यक तेथे तुमची सही करा.अर्जावर ५रु. किंमतीची तिकीट/कोर्ट फी स्टँप लावा.



३) पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडा -
● पुर्ण भरलेला व तिकीटे लावलेला अर्ज
● रेशनकार्डची सत्यप्रत
● जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
● तहसीलदारने दिलेल्या तीन वर्ष उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत
● साध्या कोऱ्या कागदावर जात व तीन वर्षाच्या उत्पन्नाबाबत तुमचे स्वतःचे सत्य प्रतिज्ञापत्र व त्यावर ५ रु. चे तिकीट/कोर्ट फी स्टँप
अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान पालकाने अर्जदाराच्या नावाने केलेले प्रतिज्ञापत्र.
नॉन-क्रिमीलेयर प्रतिज्ञापत्राचा नमुना पाहण्यासाठी इथे क्लिक करा )

४) कार्यालयीन प्रक्रिया -
● हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला अर्ज घेऊन सेतुमधे जा.
● सेतुमध्ये अर्ज व त्यावरील माहिती अचुक भरली आहे का ते तपासुन घ्या. माहिती तपासल्यानंतर तुमच्या प्रतिज्ञापत्राची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर शिक्के देऊन सक्षम प्राधिकाऱ्याची सही आणण्यासाठी पाठवले जाईल.
● शिक्के मारलेल्या अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर सक्षम प्राधिकाऱ्याची सही घ्या.
● सही झाल्यानंतर तुमचा अर्ज सेतु मधे जमा करा.
● अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचा उत्पन्नाचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते.हे टोकन जपुन ठेवावे.
● टोकनवर दिलेल्या तारखेला येऊन टोकन दाखवुन आपले नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र घ्यावे व सर्व माहिती अचुक आहे का ते तपासुन पहावे.
नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याच्या आवश्यक तेवढ्या सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा
=======================
******** सुचना ********
सुचना क्रं. १) ज्यांचे उत्पन्न मागील सलग 3 आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक वर्षी रुपये 8 लाखांपेक्षा कमी आहे,अशांनाच उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबत (नॉन-क्रिमीलेयर) प्रमाणपत्र मिळेल.

सदर उत्पन्नाची मर्यादा Government Resolution No. 3433/1/2013-Estt.(Res.), Government of India, Ministry of Personnel, Public Grievances & Pensions Department of Personnel & Training, dated 27th May, 2013 अनुसार आहे.

सुचना क्रं. २) तहसीलदार कार्यालयात सारखे हेलपाटे मारावे लागु नयेत यासाठी पुढील प्रमाणे कृती करा.

● उत्पन्नाच्या आणि जातीच्या दाखल्यासाठी एकाच दिवशी फॉर्म भरा.
● जातीचा दाखला आणायला गेलेल्या दिवशीच नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी फॉर्म भरा.
=======================
प्रत्येकाने ही माहीती शेअर करा.
जमले तर पाम्पलेट काढुन वाटा.
=======================
सौजन्य - www.esbc-maratha.blogspot in
=======================



2 comments:

  1. Mala kalel ka 26Aug,2014 la High Court chi sunavani honar hoti tyche kay zale

    ReplyDelete
  2. Date pudhe dhakalali ahe..

    ReplyDelete