Monday, August 18, 2014

मराठा जातीच्या जातक्रमवारी अनुक्रमांकाविषयी खुलासा

|| मराठा आरक्षण हेल्पलाईन ||

मराठा जातीच्या अनुक्रमांक(सिरीयल नंबर) विषयी खुलासा..

शासनाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) हा नवीन प्रवर्ग तयार करुन त्यात मराठा या एकाच जातीचा समावेश करुन त्यांना १६% आरक्षण लागु केले आहे.

मागील काही दिवसांपासुन मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत थोडेसे गोंधळाचे वातावरण होते. मराठा जातीचा शासनाच्या जात क्रमवारी मधील अनुक्रमांक उपलब्ध नसल्यामुळे काही ठिकाणी जात प्रमाणपत्रांचे वितरण थांबविण्यात आले होते/आहे.




सदर भागातील अर्जदारांसाठी हा खुलासा..
शासनाने
● SC
● ST
● NT
● OBC
● SBC
यातील प्रत्येक प्रवर्गांमध्ये एकाहुन अधिक जातसमुहांचा समावेश असल्यामुळे प्रशासकीय सोयीसाठी या प्रवर्गांतील वेगवेगळ्या जातींना वेगवेगळे अनुक्रमांक (एका जातीला एकच) दिले आहेत.
परंतु SEBC या नवीन प्रवर्गात फक्त "मराठा" या एकाच जातीचा समावेश असल्यामुळे अनुक्रमांक(सिरीयल नंबर) अजुनतरी दिलेला नाही.

भविष्यात या प्रवर्गात जर कुठल्या जातीचा समावेश करण्याची परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळी गोंधळ वाढुन परत जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया करावी लागु नये म्हणुन शासनाने मराठा जातीलाही आताच अनुक्रमांक देणे आवश्यक होते. परंतु शासनाने याबाबत अजुन काहीही पावले उचललेली नाहीत. त्यामुळे सध्यातरी तुम्हाला अनुक्रमांकासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही.

त्यामुळे मराठा जात प्रमाणपत्र काढायला गेल्यानंतर नागरी सुविधा केंद्र/सेतु मध्ये तुम्हाला जर "असा अनुक्रमांक उपलब्ध नसल्यामुळे मराठा जात प्रमाणपत्र मिळणार नाही" असे उत्तर दिले जात असेल तर स्पष्ट शब्दात त्यांना वरील खुलासा द्या.

एवढे करुनही दाखला वितरण होत नसेल तर आपल्या भागातील मराठा संघटनांच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क करुन कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करा.

[ सुचना-
* शासनानेच अजुन अनुक्रमांकासाठीचा आदेश काढला नसल्यामुळे सध्या ज्यांनी बिगर सिरीयल नंबरचे जातीचे दाखले काढले आहेत त्यांनी काळजी करु नका.

* ज्यांना अर्जंट जातीचे दाखले गरजेचे आहेत त्यांनी बिगर सिरीयल नंबरचे दाखले काढले तरी चालतील.

* भविष्यात जर मराठा जातीला अनुक्रमांक देण्याची वेळ आलीच तर ज्यांच्याकडे जातीचे दाखले आहेत त्यांना नवीन दाखले किंवा आहे या दाखल्यावरच अनुक्रमांकांची नोंदणी किंवा त्या दाखल्यासोबत अनुक्रमांकाची पुरवणी दिली जाण्याची शक्यता आहे.]

साभार - www.esbc-maratha.blogspot.in
=========================


No comments:

Post a Comment